Vijay Wadettiwar | सरकारने नाक घासून प्रायश्चित्त केलं पाहिजे – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: काल (20 ऑक्टोबर) राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. हा जीआर रद्द करत असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षावर खोचक शब्द टीका केली आहे.

काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे पाप होतं, असं भाजपने म्हटलं आहे. भाजपच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे पाप होतं, असं भारतीय जनता पक्षाने म्हटलं आहे.

त्यावेळी भाजप विरोधी पक्ष होता. तेव्हा त्यांनी या गोष्टीचा विरोध का केला नाही? तेव्हा का ते मूग गिळून गप्प बसले होते. स्वतःच्या कंपन्या होत्या, म्हणून ते गप्प बसले होते का? आज आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे आम्ही याबद्दल आवाज उठवला. या जीआरची होळी करा, असं मी म्हटलं होतं”

This GR was ruining the youth of Maharashtra – Vijay Wadettiwar 

पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “हा जीआर महाराष्ट्रातील तरुणांना उध्वस्त करणारा होता. या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर राज्यातील तरुणांनी आंदोलन सुरू केलं.

त्यानंतर दुसऱ्यांच्या अंगावर ढकलून राज्य सरकारने हा जीआर रद्द केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नाक घासून प्रायश्चित्त केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने स्वतः केलेल्या पापाची दुरुस्ती केली आहे.

यासाठी त्यांनी नाक घासायलाच हवं. त्यांनी जर खरंच असं केलं तर त्यांना बेरोजगारांच्या वेदना समजल्या, असं मी गृहीत धरेल. त्यांनी स्वतःला जोडे मारून घेतले पाहिजे. राज्य सरकार 70 हजार मेगा पदांची भरती राबवणार होते. मात्र, ही भरती अद्याप झालेली नाही. ही भरती त्यांनी का केली नाही?”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.