Devendra Fadnavis | कंत्राटी भरतीचं षडयंत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालंय – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनाने काल (20 ऑक्टोबर) कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे.
हा निर्णय मागे घेत असताना राज्य सरकारने महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे पाप होतं असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे.
अशात आता या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर खोचक शब्दात टीका केली आहे. कंत्राटी भरतीचं षडयंत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
They have deliberately tried to defame our government – Devendra Fadnavis
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “कंत्राटी भरतीचं षडयंत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं आहे.
त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलन करत आहोत. त्यांना उघड करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.
या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी आमच्यावर टीका केली आहे. मात्र, ते काय बोलत आहे? हे त्यांनाच माहित नाही. नेमकं काय बोलायचं आहे?
हे आधी त्यांनी ठरवायला हवं. एकीकडे ते म्हणतात हे सर्व आमच्या सरकारने केलं आहे, त्यांनी मान्य केलं आहे की त्यांनीच हे सर्व केलं आहे.”
दरम्यान, कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राज्य सरकार धरलं आहे. ते म्हणाले, “कंत्राटी भरती हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाप होतं असं भाजपने म्हटलं आहे.
परंतु, त्यावेळी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष होता. तेव्हा त्यांनी या गोष्टीचा विरोध का केला नाही? त्यावेळी ते मूग गिळून गप्प बसले होते.
त्यांच्या कंपन्या होत्या, म्हणून ते गप्प बसले होते का? आम्ही आज विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत. या जीआरची होळी करा, असं मी म्हटलं होतं.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | दादा भुसेंनी ललित पाटीलला पाळलं-पोसलं – संजय राऊत
- IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून शार्दुल ठाकूर बाहेर? ‘ही’ असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11
- Ajit Pawar | कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार; म्हणाले…
- Vijay Wadettiwar | सरकारने नाक घासून प्रायश्चित्त केलं पाहिजे – विजय वडेट्टीवार
- Uddhav Thackeray | राज्यात सध्या ‘प्रदूषित’ सरकार आणि त्याचं ‘दूषित’ कामकाज आहे; ठाकरे गटाचं टीकास्त्र