Sanjay Raut | दादा भुसेंनी ललित पाटीलला पाळलं-पोसलं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली आहे. त्यानंतर ललित पाटील याने खळबळजनक विधान केलं आहे. मी पळून गेलो नव्हतो मला पळवलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे.

त्याच्या या वक्तव्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दादा भुसे (Dada Bhuse) आणि संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खोचक शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती.

ललित पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून मातोश्रीवर धनुष्यबाण बांधलं. त्यांनी त्याला पक्षाचं शहर प्रमुख केलं होतं. ठाकरे गटानं ललित पाटीलला कवच-कुंडल दिलं आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हटल आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे यांनी ललित पाटीलला पाळलं- पोसलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Dada Bhuse had brought Lalit Patil to Matoshree – Sanjay Raut

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “दादा भुसे यांनी ललित पाटीलला पाळलं-पोसलं आहे, ते दादा भुसे आज पालकमंत्री पदावर विराजमान आहे.

दादा भुसे ललित पाटीलला मातोश्रीवर घेऊन आले होते. त्याचे फोटो आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे दादा भुसे यांची चौकशी व्हायला हवी. तुमच्या इंटेलिजन्सकडे याबाबत माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला माहिती देऊ.”

यावेळी बोलत असताना त्यांनी (Sanjay Raut) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

ते म्हणाले, “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं इंटेलिजन्स फेल आहे. 2020 ला ललित पाटील शिवसेनेचा शहरप्रमुख होता, असं ते म्हटलं आहेत.

1992 चे वेळी बॉम्बस्फोटात दाऊद भाजपचा अध्यक्ष होता, असं आम्ही म्हणायचं का? देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाला शोभेल असं वक्तव्य करायला हवं. काही झालं तर ते विरोधी पक्षावर ढकलून देतात.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.