Manoj Jarange | आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही आम्ही मागे हटणार नाही – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | अकलूज: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे 30 दिवसाचा वेळ मागितला होता.

पण जरांगे यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी 40 दिवस दिले. 24 ऑक्टोबर 2023 रोजी हा कालावधी संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यभर दौरे करत सभा घेत आहे.

आज त्यांची अकलूजमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही आम्ही मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने आम्हाला 30 दिवस मागितले होते. परंतु, आम्ही त्यांना 40 दिवस दिले. एवढे दिवस कसे दिले? याबाबत सरकारला आश्चर्य वाटलं होतं.

परंतु, आम्ही मुद्दाम त्यांना 40 दिवसांचा कालावधी दिला आहे. तुम्ही वेळ दिला नाही म्हणून टिकवता येणारं आरक्षण दिलं नाही, असं सांगायला ते मोकळे झाले असते.

आरक्षण टिकलं नाही, असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता. आम्ही सरकारचा हा डाव उधळून लावला आहे, कारण आम्ही सरकारला 30 ऐवजी 40 दिवस दिले आहे. त्यामुळे सरकारला आम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे.”

Our movement is going on peacefully – Manoj Jarange

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “आरक्षण मिळेपर्यंत आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. सध्या आमचं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे.

आम्ही शांततेच्या आंदोलनानं आरक्षण घेऊ. उग्र आंदोलन करू नका, त्याचबरोबर जाळपोळ करू नका, असं केलं तर आपल्या पोरांवरच केसस होतात.

पुढे त्यांना शिक्षण आणि नोकरी मिळण्यात अडचणी नको. महाराष्ट्रातील पोरांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या करायची नाही. तरुण पोरांनी जर आत्महत्या केली तर आरक्षण कशाला हवं आणि कुणासाठी हवं?”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe