Prakash Ambedkar | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? शरद पवार-प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज लावणे आता कठीणच नाही तर अशक्य झाले आहे.

अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज (21 ऑक्टोबर) भेट झाली आहे.

मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे या दोघांची भेट झाली. त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घडवून आणली असल्याची चर्चा सुरू आहे.

Supriya Sule invited me for coffee – Prakash Ambedkar

शरद पवार यांची भेट झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सुप्रिया सुळे यांनी मला कॉफी पिण्यासाठी बोलवलं होतं.

मी त्यांचं आमंत्रण स्वीकारून गेलो, तेव्हा त्या ठिकाणी कॉफी प्यायला शरद पवार देखील उपस्थित होते. माझा भारतीय जनता पक्षाला कायम विरोध आहे.

मात्र, आमच्या या भेटीमध्ये महाविकास आघाडीसोबत सामील होण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. या भेटीदरम्यान आम्ही बारा जण तिथे उपस्थित होतो.

त्यामुळे आमच्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही होईल, असं मला वाटत नाही.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे गेल्या महिन्यापासून आंदोलन करत आहे.

या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला आहे. 24 ऑक्टोबर रोजी हे 40 दिवस संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “राज्य शासनाने आता फसवाफसवीचं राजकारण थांबवायला हवं. सरकारने मनोज जरांगे यांच्यासोबत प्रामाणिक राहावं. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात सरकारने आता गंभीर भूमिका घ्यायला हवी.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.