Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांच्या कंत्राटी भरतीच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: सध्या कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलं पेटलं आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.

कंत्राटी भरती हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाप होतं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्य काय आहे? हे सर्वांना माहित आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Everyone knows what the truth is – Uddhav Thackeray

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कुणी काहीही म्हटलं तरी सत्य काय आहे? हे सर्वांना माहित आहे. या मुद्द्यावर आमच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे.

यावर संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरील प्रश्नांचे  उत्तरं आमच्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही.”

दरम्यान, यामध्ये मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे.

कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा.

राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे.

उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे . उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती.

कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची.

या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा.

२०११ सालातील मंत्री

1. विजयकुमार गावीत,
2. राधाकृष्ण विखे पाटील,
3. अजित पवार,
4. नारायण राणे,
5. दिलीप वळसे पाटील,
6.छगन भुजबळ,
7. सुनील तटकरे,
8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री ..
1. एकनाथ शिंदे
2. अजित पवार,
3. दिलीप वळसे पाटील,
4. छगन भुजबळ,
5. उदय सामंत,
6. धनंजय मुंडे,
7. शंभूराज देसाई,
8. गुलाबराव पाटील,
9. दादा भुसे,
10. संजय राठोड,
11. संदीपान भुमरे,
12 अब्दुल सत्तार,
13. संजय बनसोडे,
14. आदिती तटकरे

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.