Weather Update | कुठं उन्हाचा चटका तर कुठं ढगाळ वातावरण, वाचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे ऑक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना बसत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे.

तर कुठे थंडीची चाहूल लागली आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असला तरी उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाही. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

A low pressure area has formed in the Arabian Sea in the state

राज्यात अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. परिणामी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि परिसरातील भागामध्ये ढगाळ हवामान राहणार असून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली (Weather Update) आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

राज्यात पावसाचा इशारा दिला असला तरी राज्यातील उष्णतेच्या झळा कमी झालेल्या नाही. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याची दिसून आली आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.