Gopichand Padalkar | विष कसं पेरायचं ते शरद पवारांकडून शिकावं – गोपीचंद पडळकर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Gopichand Padalkar | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील आरेवाडीमध्ये दसरा मेळावा घेतला. यावेळी बोलत असताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दात टीका केली आहे.

विष कसं पेरायचं ते शरद पवारांकडून शिकावं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gopinath Munde was kept away from the post of Chief Minister – Gopichand Padalkar

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, “गोपीनाथराव मुंडे साहेब यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी होती. मात्र, काही आमदारांना फूस लावून गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं.

स्वर्गीय बी. के. कोकरे यांनी धनगरांसाठी पहिल्यांदा चळवळ सुरू केली होती. मात्र, त्यांना आणि त्यांची चळवळ संपवण्याचं काम यांनी केलं आहे. महाराष्ट्राला पहिल्यांदा या समाजाचा मुख्यमंत्री मिळाला असता. परंतु, त्याच्या विरोधात मोठं षडयंत्र सुरू आहे. आपण सर्वांनी हे षडयंत्र बघितलं आहे.”

पुढे बोलताना ते (Gopichand Padalkar) म्हणाले, “राजकारणासाठी शिवाजी शेंडगे बापूंना काही वर्ष वापरून घेतलं आहे. त्यानंतर त्यांना देखील बाजूला सारून टाकलं.

तर शालिनीताई पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी त्या आमदार होत्या. त्यांनी ही मागणी केल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं.

एखाद्या गोष्टीत विष कसं पेरायचं ते सगळं या माणसाकडून शिकायला हवं. बहुजन समाज एकत्र आला तर तो महाराष्ट्रामध्ये काय करू  शकतो? हे लांडग्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणून ते सातत्याने समता परिषदेला दाबायचा प्रयत्न करत असतात.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe