Maharashtra Trek | महाराष्ट्रात छोट्या आणि सोप्या ट्रेकला जायचं आहे? तर ‘या’ ठिकाणांचा करा विचार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Trek | टीम महाराष्ट्र देशा: गुलाबी थंडीमध्ये प्रत्येकाला फिरायला आणि ट्रेकिंगला जायला आवडते. फिरायला तर प्रत्येक जण जात असतो.

मात्र, ट्रेकिंगला जात असताना प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होतात की आपल्याला हे जमेल का? अशात तुम्ही जर ट्रेकिंगला ( Maharashtra Trek ) जायचा विचार करत असाल आणि तुम्ही जर छोटे आणि सोपे ट्रेक शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ( Maharashtra Trek ) सोप्या आणि छोट्या ट्रेकबद्दल माहिती सांगणार आहोत. या वातावरणात तुम्ही खालील किल्ल्यांना भेट देऊ शकतात.

तिकोना किल्ला ( Tikona Fort-Maharashtra Trek )

पवना नदी जवळ वसलेला तिकोना किल्ला पुणे शहरापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर आहे.

हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. या किल्ल्यावर छोटेखाणी मंदिर, तलाव, दोन तळी आणि धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळून येतात.

तुम्ही जर ट्रेकिंगला ( Maharashtra Trek ) जाण्याचा विचार करत असाल तर हा किल्ला तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण हा अतिशय सोपा आणि सुंदर ट्रेक आहे.

विसापूर किल्ला ( Visapur-Maharashtra Trek )

पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारा विसापूर किल्ला गिर्यारोहकांचं ( Maharashtra Trek ) लक्ष वेधून घेतो. तुम्ही जर सोपा ट्रेक शोधत असाल तर विसापूर किल्ला तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

या किल्ल्यावर तुम्हाला मारुतीचे मंदिर, छोट्या छोट्या गुफा, पाण्याची तळी इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. त्याचबरोबर गडावर सुंदर आणि लांबवर पसरलेलं पठार आहे.

या पठारावरून तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगेची सर्वोत्तम नजारे बघायला मिळतील. त्याचबरोबर हा किल्ला चढायला अत्यंत सोपा आणि सरळ आहे. त्यामुळे तुम्ही जर ट्रेकला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही विसापूरला भेट देऊ शकतात.

मल्हारगड किल्ला ( Malhargarh Fort-Maharashtra Trek )

महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहे. यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. पुणे शहराच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगेत हा किल्ला वसलेला आहे.

या किल्ल्यावर तुम्हाला मजबूत तटबंदी, विहीर, मंदिर इत्यादी गोष्टी बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर या किल्ल्यावरून कान्हा नदी, जेजुरीचा डोंगर आणि कडेपठार दिसते.

हा किल्ला चढण्यासाठी अत्यंत सोपा आहे. त्यामुळे तुम्ही जर ट्रेकिंगला ( Maharashtra Trek ) जाण्याचा विचार करत असाल तर हा किल्ला तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

महत्वाच्या बातम्या