Manoj Jarange | छगन भुजबळांचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगेंचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी राज्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.

राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या ( Manoj Jarange ) या मागणीला ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर दोन्ही समाज एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. तर यावरून मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ एकमेकांवर टीकाटिपणी करताना दिसले आहे.

अशात या प्रकरणावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

छगन भुजबळांचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला परिणाम बघावे लागतील, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

Maratha community wants to keep peace – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “मराठा समाजाला शांतता ठेवायची आहे. मराठा कार्यकर्त्यांची अटक थांबवा, त्याचबरोबर त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, अशी माझी सरकारला विनंती आहे.

जे लोक दोषी आहेत, त्यांना आम्ही समर्थन करणार नाही. परंतु, निष्पाप मराठ्यांना अटक करू नका. फक्त छगन भुजबळ यांच्या म्हणण्यावरून जर आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही तुम्हाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलेलं आहे. छगन भुजबळ यांच्या सुरत सूर मिसळवण्याचा प्रयत्न करू नका. 24 डिसेंबर पर्यंत आम्हाला आरक्षण द्या.”

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, असं गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी म्हटलं आहे. यावर देखील मनोज जरांगे ( Manoj Jarange )यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आम्हाला एक महिन्याची मुदत मागितली होती. त्यांच्या म्हणण्यावरून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे.

कायदा पारित करू हे त्यांचे शब्द आहे. अशात त्यांनी आता वेगळी वक्तव्य करू नये. त्यांच्या वक्तव्याचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे.

आम्ही ते संपूर्ण राज्यात व्हायरल करू. त्यांनी मराठा समाजाला नडू नये. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने भरकटल्यासारखं बोलू नये”, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या