Maharashtra CM | 2024 ला भाजपकडून ‘हा’ नेता घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ? देवेंद्र फडणवीसांविषयी कार्यकर्ते म्हणाले ….

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra CM | भांडरा: अजित पवार सत्तेत सामील आल्यापासून मुख्यमंत्रीपदाबाबत ( Maharashtra CM ) वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना मुख्यमंत्री ( Maharashtra CM )  पदाच्या शर्यतीत उतरवण्याचा निर्धार केला आहे. काल भंडाऱ्यातील बैठकीमध्ये बोलत असताना त्यांनी हा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला आहे.

काल भारतीय जनता पक्षाची भंडाऱ्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला.

Who took oath at Mumbai’s Wankhede ground?

मुंबईच्या वानखेडे मैदानावर कोणी शपथ घेतली? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित केला.

2024 मध्ये वानखेडे मैदानावर ( Maharashtra CM )  पदाची शपथ पुन्हा कोण घेणार? असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यासह चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांकडून आणखी एक संकल्प करून घेतला आहे.

मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणायचे आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल, असं भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलं आहे.

अशात काल भंडाऱ्यातील बैठकीमध्ये घडलेल्या घटनेनंतर भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारण बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ( Maharashtra CM ) पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या