Narendra Modi | पीएम नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; करणार शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

Narendra Modi | सिंधुदुर्ग: तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात निवडणुकांचं सत्र सुरू होतं. तेलंगणा वगळता उर्वरित तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली आहे.

यानंतर भारतीय जनता पक्ष आनंद साजरा करताना दिसत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आज पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येणार आहे.

आज संध्याकाळी 4.15 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Narendra Modi )  महाराष्ट्रामध्ये दाखल होतील. त्यानंतर ते  ( Narendra Modi ) सिंधुदुर्ग येथे नौदल दिन 2023 च्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Narendra Modi will visit Sindhudurg today

पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Narendra Modi ) आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी कोकणकरांनी जोरदार तयारी केली आहे.

त्याचबरोबर स्वच्छता आणि सुरक्षेवर जास्त भर देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Narendra Modi ) सिंधुदुर्ग शहरांमध्ये दाखल होणार असल्यामुळे आठवड्याभरा आधीच या ठिकाणी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

तर आज सिंधुदुर्ग शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहे. नौदल दिन 2023 कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Narendra Modi ) यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे इत्यादी मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, 4 डिसेंबर हा दरवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सिंधुदुर्गमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्र सागरी वारशाला आदरांजली अर्पण करणार आहेत.

दरवर्षी, नौदलदिनानिमित्त भारतीय नौदलची जहाजे, पाणबुड्या, विमान आणि विशेष दलांद्वारे कार्यान्वयन प्रात्यक्षिके आयोजित केली जातात.

कार्यान्वयन प्रात्यक्षिके लोकांना नौदलाबद्दल अधिक माहिती देतात. त्याचबरोबर याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सागरी जनजागृती होते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.