BJP | भाजप निवडणूक जिंकताच; पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना मारहाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP | बुलढाणा: भारतामध्ये काल चार राज्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचं ( BJP ) वर्चस्व दिसलं आहे.

चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पक्षाने  ( BJP ) विजय मिळवला आहे. यानंतर राज्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मेहकर येथे भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे निवडणूक प्रमुख यांच्या वॉर रूममध्ये मेहकर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे आणि ता. अध्यक्ष सारंग माळेकर हे उपस्थित असताना अचानक काही पदाधिकाऱ्यांनी येऊन त्यांच्यावर हल्ला केला.

त्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर या नेत्यांनी भाजप  ( BJP )  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. शिव ठाकरे, प्रल्हाद लष्कर, अक्षय दीक्षित, चंदन आडलकर, रोहित सोळंके, विकास लष्कर ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे आहे. या सर्व कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

Who will take oath as Chief Minister at Wankhede Stadium in 2024?

दरम्यान, काल भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाची  ( BJP ) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना एक प्रश्न विचारला.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर शपथ कोणी घेतली होती? या प्रश्नानंतर त्यांनी आणखीन एक प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला. 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार?

बावनकुळे यांनी हा सवाल उपस्थित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं नाव घेतलं. आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाईल, असं भाजपने म्हटलं होतं.

अशात चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला. या सर्व घडामोडीनंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात वाद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या