Manoj Jarange | वेगळी विधान करून गिरीश महाजनांनी मराठा समाजाला नडू नये – मनोज जरांगे

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाज जागोजागी रस्ता रोको, आंदोलन, उपोषण करताना दिसत आहे.

या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने मुदत मागितली होती. मराठा समाजाने ( Manoj Jarange ) या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

अशात भाजप नेते गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेगळी विधान करून गिरीश महाजनांनी मराठा समाजाला नडू नये, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange )  यांनी म्हटलं आहे.

Girish Mahajan should not make a different statement – Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेल्या वेळ पुरेसं नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.

आम्ही त्यांना चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यांनी आम्हाला एक महिन्याची मुदत मागितली, त्यानंतर आम्ही त्यांना ती दिली. कायदा पारित करतो, त्याचबरोबर मराठ्यांच्या नोंदीचा अहवाल बनवू, हे त्यांचे शब्द आहेत.

त्यामुळे त्यांनी आता वेगळी विधान करू नये. त्याचबरोबर त्यांनी मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये. त्यांच्या विधानाचे सर्व रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे.

आम्ही ते रेकॉर्डिंग संपूर्ण राज्यात व्हायरल करू. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यांन भरकटल्यासारखं वक्तव्य करू नये. गिरीश महाजन यांना संकटमोचन म्हणतात.

त्यामुळे त्यांनी शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता, म्हणून आम्ही त्यांना तीन वेळा मानसन्मान दिला आहे.”

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

“ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.