Rishabh Pant | CSK चाहत्यांसाठी मोठी बातमी; संघाचा नवीन कर्णधार होणार ऋषभ पंत?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट बघत आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे.

आयपीएलमध्ये 2024 मध्ये महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) चेन्नई सुपर किंग ( Chennai Super King ) संघाचं नेतृत्व करणार आहे. धोनी त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

अशात धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नईचे नेतृत्व कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी विकेटकीपर दीप दास गुप्ताने मोठं विधान केलं आहे. चेन्नईचे नेतृत्व ऋषभ पंत ( Rishabh Pant ) करु शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

Who will captain Chennai Super Kings after Dhoni?

आयपीएल 2024 महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचं बोललं जात आहे. 42 वर्षीय महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग संघाचं कर्णधार पद कोण सांभाळेल? असा सवाल संघापुढे उपस्थित झाला आहे.

यावर बोलत असताना भारताचा माजी विकेटकीपर दीप दास गुप्ताने दिल्ली कॅपिटलचा कर्णधार ऋषभ पंतचं  ( Rishabh Pant ) नाव घेतलं आहे.

“आयपीएल 2025 मध्ये सीएसकेने जर ऋषभ पंत  ( Rishabh Pant ) ला संघाचा कर्णधार बनवलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

कारण पंत  ( Rishabh Pant ) हा महेंद्रसिंग धोनीच्या जवळचा आहे. दोन्ही खेळाडू बराच काळ एकत्र खेळले आहे.

त्याचबरोबर दोघांची खेळण्याची शैली बहुतांश सारखी आहे. दोघेही कायम विजय याबद्दल बोलत असतात”, असं दीप दास गुप्ताने म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय संघातील स्फोटक फलंदाज ऋषभ पंत  ( Rishabh Pant )  गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे.

कारण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली असून तो या दुखापतीतून सावरत आहे.

त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. त्याचबरोबर तो सरावासाठी मैदानात येत आहे. अशात ऋषभ पंत आयपीएल 2024 खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या