Travel Guide | हिवाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा विचार करत आहात? तर ‘ही’ ठिकाण ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक फिरायला जाण्याचा विचार करत असतात. कारण या थंडीच्या वातावरणामध्ये फिरण्याची ( Travel Guide ) मजा वेगळीच असते.

या ऋतूमध्ये तुम्ही ऊन, पाऊस घामाची चिंता न करता तुम्ही मनसोक्त प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. अशात तुम्ही जर फिरायला ( Travel Guide ) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

कारण बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी असलेल्या सर्वोत्तम पर्यायांबद्दल माहिती सांगणार आहोत. हिवाळ्यामध्ये तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

हम्पी, कर्नाटक ( Hampi, Karnataka-Travel Guide )

कर्नाटक राज्यामध्ये स्थित असलेलं हम्पी शहर हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतं. या ठिकाणी तुम्हाला भारताची जुनी परंपरा आणि संस्कृती बघायला मिळेल.

हम्पीमध्ये अनेक जुनी मंदिर आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही सर्कल बोट राईडचा आनंद घेऊ शकतात.

हम्पीला तुम्ही रेल्वे किंवा बसने जाऊ शकतात. कमीत कमी बजेटमध्ये तुमची हम्पीची सहल पूर्ण होऊ शकते. तीन दिवस हम्पी फिरायला तुम्हाला साधारण सहा हजार रुपये खर्च लागू शकतो.

उटी, तामिळनाडू  ( Ooty, Tamil Nadu-Travel Guide )

या हिवाळ्यामध्ये तुम्ही जर हिल स्टेशनला भेट देण्याचा ( Travel Guide ) विचार करत असाल तर उटी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

निलगिरी पर्वतरांगेमध्ये वसलेले उटी हे एक अत्यंत सुंदर शहर आहे. उटीला ‘क्वीन ऑफ हिल्स’ असं देखील म्हणतात.

हे शहर समुद्रसपाटीपासून 2240 मीटर उंचीवर वसलेलं आहे. या ठिकाणी असलेले चहाचे मळे, डोंगर, पर्यटकांना आकर्षित करतात.

उदयपूर, राजस्थान  ( Udaipur, Rajasthan-Travel Guide )

राजस्थानमध्ये वसलेलं उदयपूर शहर ‘सिटी ऑफ लेक्स’ म्हणून पण ओळखलं जातं. उदयपूर शहराच्या चारही बाजूंनी अरवली पर्वतरांग ( Travel Guide ) आहे.

त्यामुळे शहराचं वातावरण अत्यंत अनुकूल असतं. या ठिकाणी असलेले तलाव, राजवाडे इत्यादी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. नोव्हेंबर ते जानेवारी हा उदयपूरला भेट देण्यास सर्वोत्तम कालावधी आहे.

जैसलमेर, राजस्थान  ( Jaisalmer, Rajasthan-Travel Guide )

थंडीच्या दिवसात तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर जैसलमेर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ( Travel Guide ) आहे.

जैसलमेरमध्ये असलेलं वाळवंट पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. जैसलमेरमध्ये तुम्ही वाळवंट आणि उंट सफारीचा आनंद घेऊ शकतात.

त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही अनेक ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करू शकतात. यामध्ये तुम्ही क्वाड बाइकिंग, डून बॅशिंग, पॅरासेलिंग इत्यादी ऍक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या