Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? सर्वोच्च न्यायालयात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे.  मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळावं, यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले होते. यानंतर आता ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

या दौऱ्यादरम्यान त्यांच्या राज्यात भव्यसभा होत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण  ( Maratha Reservation ) मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने मांडली आहे.

अशात राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत  ( Maratha Reservation ) क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती. उद्या सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

The petition will be heard on December 6, 2023

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या  ( Maratha Reservation ) पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती.

उद्या म्हणजे 6 डिसेंबर 2023 रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी चार सदस्य खंडपीठांसमोर होणार आहे. यापूर्वी मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण  ( Maratha Reservation ) रद्द केलं होतं.

त्यानंतर पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या दुपारी दीड वाजता ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण  ( Maratha Reservation ) मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठा लढा उभारला आहे.

राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.