IPL 2024 | ‘हा’ स्फोटक गोलंदाज आयपीएल 2023 मधून बाहेर; बोर्डाने खेळण्यास दिला नकार

IPL 2024  | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आईपीएलची क्रिकेट चाहते कायम उत्सुकतेने वाट बघत असतात.

19 नोव्हेंबर 2023 रोजी आयपीएल 2024 ( IPL 2024 ) चा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी तब्बल 1166 खेळाडूंच्या नावाची नोंदणी झाली आहे.

यानंतर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज आयपीएल 2024  ( IPL 2024 ) ला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. क्रिकेट बोर्डाने या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

Jofra Archer will not play in IPL 2024

इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer ) याला मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलं आहे. त्यानंतर तो आयपीएल 2024  ( IPL 2024 ) मध्ये खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चर आयपीएल 2024 मधून माघार घ्यायला सांगितली आहे.

यामुळे जोफ्रा आर्चरचं लिलावासाठी नाव देखील नोंदवण्यात आलेलं नाही. गेल्या आयपीएल हंगामामध्ये दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल हंगाम खेळता आला नव्हता. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. अशात तो आयपीएल 2024 ( IPL 2024 ) खेळणार नसल्याचं देखील बोललं जात आहे.

दरम्यान, जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये आयपीएल लीगमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर त्याने 4 आयपीएल हंगामामध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे.

यादरम्यान त्याने 40 सामने खेळलेले असून या सामन्यांमध्ये त्याने 48 विकेट्स आपल्या नावावर केलेल्या आहेत. अशात तो आयपीएल 2024  ( IPL 2024 ) खेळणार नसल्यामुळे यंदा आयपीएलमध्ये एका स्फोटक गोलंदाजाची कमतरता भासणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.