Travel Tips | भारताची कला आणि संस्कृती बघायची आहे? तर डिसेंबर महिन्यात ‘या’ ठिकाणांना द्या भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: डिसेंबर महिन्यामध्ये वातावरण अत्यंत शांत आणि थंड असते. या वातावरणामध्ये फिरण्याची वेगळीच मजा असते.

त्यामुळे तुम्ही जर या वातावरणामध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भारतातील काही सुंदर आणि आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकतात.

डिसेंबर महिन्यात तुम्हाला या ठिकाणी भारताच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन होऊ शकते. कारण डिसेंबर महिन्यात या ठिकाणी काही पारंपारिक उत्सव आयोजित केले जातात. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

रन ऑफ कच्छ, गुजरात ( Run of Kutch, Gujarat-Travel Tips )

तुम्ही जर गुजरातला फिरायला ( Travel Tips ) जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही रन ऑफ कच्छ नक्की भेट देऊ शकतात.

या ठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठ्या आनंदात आणि उत्साहात कच्छ महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाला देशासह विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात.

सुंदर अशा मिठाच्या वाळवंटामध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवामध्ये तुम्हाला भारताची जुनी कला आणि परंपरा बघायला मिळू शकते.

Run of Kutch

हॉट एअर बलून फेस्टिवल, कर्नाटक ( Hot Air Balloon Festival, Karnataka-Travel Tips )

या हिवाळ्यामध्ये तुम्ही फिरण्यासह  ( Travel Tips ) अॅडवेंचर अॅक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डिसेंबर महिन्यात कर्नाटक दौरा काढू शकतात.

कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी डिसेंबर महिन्यात हॉट एअर बलून फेस्टिवल आयोजित केला जातो. मैसूर, बंगलोर आणि हम्पी या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट नजारे कॅमेऱ्यामध्ये टिपायला मिळतील. गर्दी टाळण्यासाठी तुम्ही आठवड्याच्या दिवशी हॉट एअर बोलून राईट करण्याचा विचार करू शकतात.

Hot Air Balloon Festival

संगीत महोत्सव, चेन्नई ( Music Festival, Chennai-Travel Tips )

संगीत प्रेमी चेन्नईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत महोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य, संगीत आणि शास्त्रीय नृत्य इ. सादरीकरण होते.

भारताची कला आणि संस्कृती बघण्यासाठी हा एक उत्तम पर्याय  ( Travel Tips ) आहे. त्याचबरोबर या महोत्सवामध्ये तुम्हाला वीणा, मृदुंग, बासरी इत्यादींच्या मधुर सूर ऐकण्याची संधी मिळते.

त्यामुळे तुम्ही जर संगीत प्रेमी असाल आणि फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा महोत्सव तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Music Festival, Chennai

हॉर्नबिल फेस्टिवल, नागालँड ( Hornbill Festival, Nagaland-Travel Tips )

दरवर्षी नागालँडच्या स्थापना दिनी होर्नेबल फेस्टिवल आयोजित केला जातो. हा महोत्सव 1 डिसेंबर पासून ते 10 डिसेंबर असा 10 दिवस चालतो.

या महोत्सवामध्ये तुम्हाला नागा जमतींचे पारंपरिक खेळ, पारंपरिक पोशाख, पारंपारिक वाद्य, नृत्य, संगीत इत्यादी पाहण्याची संधी मिळते. या महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील नॉर्थ ईस्ट भागाच्या संस्कृतीचे  ( Travel Tips ) दर्शन घडेल.

Hornbill Festival, Nagaland

महत्वाच्या बातम्या