Santosh Deshmukh । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी नवीन एसआयटीची नुकतीच स्थापना केली आहे. महत्त्वाचे म्हणजे एसआयटीची स्थापना केल्यानंतर बीड जिल्ह्यात महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली यांनी बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आजपासून ते 28 जानेवारीपर्यंत बीडमध्ये हे जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. सध्या आरक्षणाच्या (Reservation) मागणीसाठी मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे.
Demonstration in Beed district
तसेच 25 जानेवारी पासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासह सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्याचे वातावरण तापले आहे. यावरून आता कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश लागु केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Missile Attack On Israel : मोठी बातमी! हूथी बंडखोरांचा इस्रायलवर मिसाईल हल्ला, 5 इस्रायली सैनिक ठार, 8 जखमी
- “वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी…”; बीड प्रकरणावरून Rohit Pawar यांचा अजितदादांवर खळबळजनक आरोप
- संतोष देशमुखांना न्याय मिळणार? आज न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी, Walmik Karad वर लागणार मोक्का?