Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख हत्येला (Santosh Deshmukh murder case) एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. याच प्रकरणावरून सध्या राज्याचे वातावरण चिघळले आहे. यातच आता मोठी अपडेट समोर येत आहे.
वाल्मिक कराड प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात जाणार आहे. कारण लवकरच खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) हे अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहे. बजरंग सोनावणे या भेटीदरम्यान संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड प्रकरणाबद्दल चर्चा करू शकतात. यावर आता अमित शाह काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Bajrang Sonawane meets Amit Shah
दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे. “आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होत आहे. माझा मुलगा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी पारुबाई बाबुराव कराड (Parubai Baburao Karad) यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :