Share

Walmik Karad ला मोक्का, संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा होणार दाखल?

by MHD
Mokka to Walmik Karad

Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आज खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान कराडला मोठा धक्का बसला आहे.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्याचा ताबा एसआयटी घेऊ शकते. हा कराडसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे तपासाला आणखी गती मिळू शकते.

तसेच वाल्मिक कराडवर मोक्का लावनंतर सीआडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा देण्याची विनंती केली होती. महत्त्वाचे म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडचे व्हाईस सॅम्पल घेतले आहेत. त्याशिवाय त्याने देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

तर दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या सुटकेसाठी त्याची आई पारुबाई कराड आणि त्याच्या समर्थकांनी सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. तसेच आता वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांना शरण आल्यांनतर त्याच्यावर कारवाई करण्यास इतका उशीर का झाला? वाल्मिक कराडला अटक होऊन १५ दिवस झाले तरी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली नव्हती. आज न्यायालयाने त्याच्यावर मोक्का लावला. याला कोण कारणीभूत आहे? हे राज्य सरकारचे अपयश नाही का?

वाल्मिक कराडच्या मागे असा कोणाचा हात आहे? ज्यामुळे पोलीस प्रशासनासह न्यायालयदेखील शिक्षा देण्यास कचरत आहे? असा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनात पडला आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जातो. या प्रकरणी मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी का घेतला नाही? यावरून अजित पवारांची (Ajit Pawar) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील कानउघडणी केल्याची माहिती आहे.

यापूर्वी ज्या राजकीय नेत्यांवर असे आरोप झाले त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे धनंजय देशमुख यांना आपल्या प्रतिष्ठेपेक्षा सत्ता महत्त्वाची आहे का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य करत आहेत. त्याशिवाय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी जबाबत धक्कादायक खुलासे करत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची नावे देखील घेतली. तरीही पोलिसांनी आरोपींवर कोणतीच कारवाई केली नाही.

Mokka to Walmik Karad

धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडला मोक्का लावला तर तो तपासणीदरम्यान धनंजय मुंडे यांचे नाव घेऊ शकतो. असे झाले तर याचा मोठा फटका धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह अजित पवारांना बसू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

During the hearing, the court has placed a moratorium on Walmik Karad. He has also been sent to judicial custody for 14 days.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now