Walmik Karad । वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीने अटक केली आहे. पण त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. आज त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
तसेच वाल्मिक कराडच्या आईने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडवर अन्याय होत आहे. माझा मुलगा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी पारुबाई कराड (Parubai Karad) यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर केली. यावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीत त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या? नातवाकडे बंदूक कशासाठी आहे? हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? तसेच आपला मुलगा काय उद्योग करतो? संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का? आवादा कंपनीच्या लोकांनी केलेला FIR खोटा आहे का? गोट्या गित्ते सारखी माणस सदगृहस्त आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत वास्तव वास्तव चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे.
Anjali Damania on Walmik Karad Mother
दरम्यान, आज कराडला केज सत्र न्यायालयात हजर केले आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल का? याकडे देशमुख कुटुंबियांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. जर त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली तर या तपासाला आणखी वेग येईल.
महत्त्वाच्या बातम्या :