Dhananjay Deshmukh । आज केज न्यायालयाकडून वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्का लावण्यात आला आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे तपासाला आणखी गती मिळू शकते. (Mokka to Walmik Karad) यावर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, “आमची शेवटपर्यंत एकच मागणी आहे. या कट कारस्थानात जे माणसं आहेत त्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मला CID वर विश्वास आहे. सीआयडीने पहिल्या सुनावणी दरम्यान जो युक्तिवाद केला होता त्यामध्ये खंडणी ते खून प्रकरणात कनेक्शन आहे, असं होतं. त्या संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे असतील म्हणूनच त्यांनी ताबा मिळावा यासाठी विनंती केली.”
दरम्यान, आता वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यानंतर आता या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना शिक्षा कधी मिळणार? देशमुख कुटुंबियांना न्यायासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार? असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात पडत आहे.
Dhananjay Deshmukh on Walmik Karad
तर एकीकडे वाल्मिक कराडवर मोक्का लागला आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मोक्का लावल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच परळी बंद केली आहे. दवाखाने आणि मेडिकल सोडून सर्व दुकानं देखील बंद केली आहेत. कराड समर्थकांनी परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाण मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले