Dhananjay Munde । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर सर्वात जास्त टीकेचा सामना करावा लागतोय तो म्हणजे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना. विरोधी पक्षनेत्यांसह भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागू शकतो अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणातील आरोपींची हयगय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात काही आरोपींचा पक्षाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे.
यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे, असे बोलले जात आहे. कारण त्यांचं बीडमध्ये वर्चस्व आहे. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून विष्णू चाटे याच नाव आले. त्यामुळे हा निर्णय घेणयात आला आहे.
NCP Beed District Committee Dissolved
इतकेच नाही तर तालुक्याची कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हे काम पाहणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :