Chhagan Bhujbal । मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) नेते छगन भुजबळ नाराज आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे अनेकदा त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. तसेच ते पक्ष सोडून जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या.
अशातच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत एकाच कारमधून प्रवास देखील केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांसोबत (Sharad Pawar) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून शरद पवार गट किंवा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते.
जर असे झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान, आता छगन भुजबळ यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Chhagan Bhujbal will present to NCP Adhiveshan
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबत राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. आपण स्वतः त्यांच्यासोबत चर्चा केल्याचं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :