Sharad Pawar । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर फोडाफोडीच्या राजकरणाला सुरुवात केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर शरद पवार यांनीही माहिती घेऊन भाषण करा असा सल्ला शाह यांना दिला. तसेच टीका करताना तडीपार असा उल्लेख केला होता.
यावर आता भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक आणि इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती,” अशा आशयाची पोस्ट तावडेंनी एक्सवर केली आहे.
“दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत,” अशी जहरी टीका विनोद तावडे यांनी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू शकते.
Sharad Pawar vs Vinod Tawade
दरम्यान, आता राज्यात शरद पवार विरुद्ध अमित शाह असा संघर्ष निर्माण झाला आहे. यावर आता भाजपचे नेते प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. त्यामुळे आता शरद पवार गट भाजपने केलेल्या टीकेवर काय प्रत्युत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे महायुतीमध्ये असणारा अजित पवार गट (Ajit Pawar group) भाजपच्या या टीकेचे समर्थन करतो का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :