🕒 1 min read
Suresh Dhas । संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप करत असतात. यामुळे अनेकदा ते चर्चेच्या केंद्रस्थानी येतात.
अशातच आता त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “वाल्मिक कराड बरोबर माझे चांगलं संबंध होते पण तो ज्या पद्धतीने माणसं मारायला लागला तर त्याचे समर्थन करायचे का? मित्र आहे म्हणून त्याचं समर्थन समर्थन करायचे का?,” असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, काल वाल्मिक कराडवर मोक्का (Mokka) कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. पण आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Suresh Dhas on Walmik Karad
कारण काल एसआयटीकडून वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल असल्याचे सांगत ताबा मागण्यात आला होता. त्यामुळे आता आज कराडला पोलीस कोठडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात, असे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- काल मोक्का अन् आज हत्येच्या गुन्ह्यात अडकणार Walmik Karad? कोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी
- Dhananjay Munde यांना मोठा धक्का! पक्षाची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, नेमकं कारण काय?
- Chhagan Bhujbal यांना पुन्हा धक्का? अजित पवार गटाने घेतला मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now