Share

“राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा”; Suresh Dhas यांचा पुन्हा हल्ला

The Santosh Deshmukh murder case is heating up in the state. On this BJP MLA Suresh Dhas is targeting Walmik Karad and Minister Dhananjay Munde.

by MHD

Published On: 

Suresh Dhas criticizes-ncp

Suresh Dhas । राज्यात संतोष देशमुख हत्याप्रकरण (Santosh Deshmukh murder case) चांगलेच तापत चालले आहे. यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या मुन्नीचा उल्लेख केला होता. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी मुन्नीचा उल्लेख केला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांना सांगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा,” अशी विनंती सुरेश धस यांनी केली आहे. यावरून पुन्हा एकदा धस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीची मुन्नी कोण? याचा उलगडा अजून झाला नाही.

कोर्टाने कराडला 22 जानेवारीपर्यंत म्हणजे आणखी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे. वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात काय बोलणं झाला याचा तपास करायचा आहे. कारण संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याने कराडच्या दहा दिवसाच्या कोठडीची मागणी एसआयटीने केली होती.

Suresh Dhas criticizes NCP

पण आता कोर्टाने 10 नाही तर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच कराडनेच हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केला होता. यामुळे कराडच्या अडचणीत भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही