Share

Walmik Karad ने हत्येच्या दिवशी दिली संतोष देशमुखांना धमकी! एसआयटीने सादर केला मोठा पुरावा

The SIT has claimed that it was Walmik Karad who threatened Santosh Deshmukh on the day of the murder. Karad has been remanded in police custody till January 22 i.e. for another 7 days. This has given Karad a big shock.

by MHD

Published On: 

Walmik Karad threatened Santosh Deshmukh

Walmik Karad । सध्या वाल्मिक कराड याच्यावर बीड न्यायालयात सुनावणी सुरु आहे. देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. अशातच आता एसआयटीने न्यायालयात वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा सादर केला आहे. यामुळे कराडच्या अडचणीत भर पडली आहे.

ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून बोलणं झाल्याचे माहिती एसआयटीने बीड जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात काय बोलणं झाला याचा तपास करायचा आहे. कारण संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याने कराडच्या दहा दिवसाच्या कोठडीची मागणी एसआयटीने केली होती.

Walmik Karad threatened Santosh Deshmukh

कराडनेच हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केला आहे. कराडला 22 जानेवारीपर्यंत म्हणजे आणखी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे. कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी देत न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही