Share

Gopinath Munde यांनीच आणला होता मकोका कायदा, ज्याचा बसला Walmik Karad ला झटका

by MHD
MCOCA Act was introduced by Gopinath Munde

Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड पुरताच अडकला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत भर पडत चालली आहे. सध्या त्याच्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई सुरु आहे.

पण अनेकांना प्रश्न पडला आहे की मोक्का कायदा कधी आला? आणि तो कोणी आणला? भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनीच गृहमंत्री पदावर असताना हा कायदा आणला आहे आणि याच कायद्यात आता त्यांच्या घरी काम करणारा व्यक्ती अडकला आहे.

1992 आणि 93 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. यावेळी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी पुढाकार घेतला आणि राज्यात 24 फेब्रुवारी 1999 साली मकोका कायद्याची अंमलबजावणी केली. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार अस्तित्वात होते.

MCOCA Act was introduced by Gopinath Munde

‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका कायदा अंमलात आणला आहे. हा खटला विशेष कोर्टात चालतो. त्याकाळी गोपीनाथ मुंडे यांनी अंमलात आणलेल्या या कायद्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड चांगलाच अडकला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या :

Walmik Karad, a close associate of Minister Dhananjay Munde, is heavily involved in this law implemented by Gopinath Munde.

Maharashtra Marathi News Politics