Sharad Pawar । आज कृषी विज्ञान केंद्रातर्फे बारामतीमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनाचे (Krushik Agri Expo) उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली. “अजित दादा मला कृषी खाते देतील, अशी अपेक्षा नव्हती. मी ते मागितलं देखील नव्हतं. पण अजितदादांसारखं कुणालाच कळत नाही. एवढं हुशार व्यक्तिमत्व बारामतीत आहे,” असे वक्तव्य कोकाटे यांनी केले आहे.
“2021 मध्ये अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांना राज्य सरकारचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. पण त्यांनी आता तो पुरस्कार स्वीकारावा,” अशीही विनंती त्यांनी केली.
Manikrao Kokate on Ajit Pawar
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या टीकेवर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी पडली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण शरद पवार यांच्या समोरच माणिकराव कोकाटे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. यावर आता शरद पवार गट काय प्रत्युत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :