Share

हेनरिक क्लासेनचा IPL मध्ये वादळी शतक, रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

Heinrich Klaasen smashed a 37-ball century against KKR, equaling Rohit Sharma’s IPL record and setting new milestones for Sunrisers Hyderabad.

Published On: 

Heinrich Klaasen smashed a 37-ball century against KKR, equaling Rohit Sharma’s IPL record and setting new milestones for Sunrisers Hyderabad.

🕒 1 min read

दिल्ली – आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या हेनरिक क्लासेनने ( Heinrich Klaasen ) एक इतिहासिक कामगिरी केली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात क्लासेनने अवघ्या 37 चेंडूत शतक झळकावलं आहे.

या झंझावाती खेळीमध्ये त्याने 6 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर नाबाद 105 धावा ठोकल्या. क्लासेनचा हा पराक्रम आयपीएल इतिहासातील संयुक्तरित्या तिसरं वेगवान शतक ठरलं आहे, ज्यामुळे त्याने यूसुफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Heinrich Klaasen 37-Ball Century

हेनरिक क्लासेन सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. याआधी ट्रेव्हिस हेडने 39 चेंडूत शतक झळकावलं होतं. क्लासेनने हेडचाही रेकॉर्ड मोडला.

या शतकामुळे क्लासेनने रोहित शर्माच्या आयपीएलमधील दोन शतकांच्या विक्रमाचीही बरोबरी साधली आहे — विशेष म्हणजे रोहितला हे करण्यासाठी 269 सामने लागले, तर क्लासेनने केवळ 49व्या सामन्यातच ही कामगिरी पार केली.

SRH च्या या सामन्यातील एकूण धावसंख्येनेही इतिहास रचला. त्यांनी 20 षटकांत केवळ 3 विकेट्स गमावून 278 धावा केल्या — आयपीएलमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही