पाटणा | प्रतिनिधी: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मोठ्या मुलाबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे. तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत त्यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं की, “व्यक्तिगत जीवनातील वागणूक आणि नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या सामाजिक न्यायाच्या संघर्षावर परिणाम होतो. तेज प्रताप याचं वर्तन आमच्या कौटुंबिक परंपरांशी सुसंगत नाही, म्हणून हा निर्णय घेतला आहे.”
Lalu Yadav Expels Tej Pratap from RJD
लालूंनी स्पष्ट केलं की, तेज प्रताप यांना आता ना पक्षात ना कुटुंबात कोणतीही भूमिका असेल. “तो स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, लोकांनी त्याच्याशी संबंध ठेवायचा की नाही हे आपल्या विवेकबुद्धीवर ठरवावं,” असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यांनी अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत 12 वर्षांच्या नात्याची कबुली दिली होती. यामुळेच लालूंनी कठोर निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
यावर तेज प्रताप यादव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, “माझं अकाऊंट हॅक झालं आहे, फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून पोस्ट करण्यात आले. हे कुटुंबाची आणि माझी बदनामी करण्यासाठी केली जात आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रिटी झिंटा संतापली! तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर टीका, म्हणाली – ‘अशा चुका अस्वीकार्य’
- IPL 2025: धोनी कॅप्टन म्हणून आज खेळणार शेवटचा सामना, गुजरात विरुद्ध अंतिम झुंज
- ‘Bigg Boss’ OTT 4 यंदा रद्द; बिग बॉस 19 होणार साडेपाच महिन्यांचं सर्वात लांब सीझन













