Share

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक शतकावर सचिन, युवराज, शमी आणि युसुफ पठानकडून कौतुकाचा वर्षाव

Cricket legends like Sachin Tendulkar, Yuvraj Singh, Mohammed Shami, and Yusuf Pathan hail 14-year-old Vaibhav Suryavanshi after his record-breaking IPL century.

Published On: 

Vaibhav Suryavanshi IPL Century Earns Praise from Sachin Tendulkar, Yuvraj Singh, Shami, and Yusuf Pathan ॰ Vaibhav Suryawanshi

28 एप्रिल 2025 ची संध्याकाळ इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2025 ) इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. अवघ्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. त्यामुळे तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात लहान वयात शतक ठोकणारा खेळाडू ठरला. तसेच T20 मध्ये सर्वात जलद शतक करणारा पहिला भारतीय ठरण्याचा मानही त्याने पटकावला.

वैभवच्या शानदार कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याचं जोरदार कौतुक सुरू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वैभवच्या इनिंगचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या खेळातील “बिनधास्त अप्रोच, बॅट स्पीड आणि चेंडूवर नियंत्रण” याचं विशेष उल्लेख केला आहे. युवराज सिंगनेही “14 व्या वर्षी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करणाऱ्या या मुलाच्या खेळाचं कौतुक” केलं आहे.

Vaibhav Suryavanshi IPL Century Earns Praise from Sachin Tendulkar, Yuvraj Singh

गोलंदाज मोहम्मद शमीने वैभवच्या प्रतिभेचं वर्णन “अविश्वसनीय” असं करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर युसुफ पठानने “राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना माझा विक्रम मोडणं ही खूप खास गोष्ट आहे,” असं म्हटलं. वैभव सूर्यवंशीचा पराक्रम केवळ एक शतक नाही, तर भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या आशेचा नवा किरण आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही