🕒 1 min read
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryawanshi ) याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. सोमवारी (२८ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १४ वर्षांच्या वैभवने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. वैभवने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत आयपीएलमधील सर्वात वेगवान भारतीय शतक ठोकले.
वैभवने IPL 2025 मध्ये अवघ्या १७ चेंडूंमध्ये अर्धशतक आणि पुढील १८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याने ११ षटकार आणि ७ चौकारांसह एकूण १०१ धावा केल्या. वैभवने यापूर्वीचा यूसुफ पठाणचा ३७ चेंडूत शतकाचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलमध्ये ख्रिस गेलनेच वैभवच्या आधी ३० चेंडूत शतक ठोकले आहे.
Vaibhav Suryawanshi Scores Fastest IPL Century by an Indian | IPL 2025
या ऐतिहासिक खेळीनंतर संपूर्ण सोशल मीडिया वैभवच्या नावाने गाजत आहे. अनेक क्रिकेट दिग्गजांकडून वैभवच्या खेळीचं कौतुक होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही इंस्टाग्राम स्टोरीद्वारे वैभवच्या खेळीला ‘क्लास’ असा उल्लेख करत त्याचे विशेष कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हल्ल्यानंतर सलमान खानचा भावनिक निर्णय; निषेध व्यक्त करत घेतला मोठा निर्णय
- ‘रेड २’च्या प्रदर्शनाआधी सेन्सॉर बोर्डाची कारवाई, दोन डायलॉग्समध्ये बदल
- डायरेक्टर थांब म्हणतोय, तरी विनोद खन्ना डिंपलला किस करतच राहिला; भडकलेल्या डिंपलने..