Share

डायरेक्टर थांब म्हणतोय, तरी विनोद खन्ना डिंपलला किस करतच राहिला; भडकलेल्या डिंपलने..

Vinod Khanna lost control during kissing scenes with Dimple Kapadia and Madhuri Dixit, creating major controversies in Bollywood.

Published On: 

Vinod Khanna Dimple Kapadia and Madhuri Dixit Kissing Scenes | Bollywood Controversies

🕒 1 min read

मुंबई | २८ एप्रिल:

हिंदी चित्रपटसृष्टीत विनोद खन्ना ( Vinod Khanna ) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘हेरा फेरी’, ‘खून पसीना’ आणि ‘दयावान’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांची कारकीर्द अधिक बहरली.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘मार्ग’ चित्रपटाच्या सेटवर डिंपल कपाडिया यांच्यासोबत किसिंग सीन शूट करताना विनोद खन्ना यांचा संयम सुटल्याची घटना घडली. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना यांनी डिंपलला किस करणे थांबवले नाही. त्यामुळे घाबरलेली डिंपल थेट मेकअप रूममध्ये जाऊन लपली.

विनोद खन्ना नशेत असल्याने कट समजला नाही, असे त्यांचे स्पष्टीकरण होते. मात्र डिंपलचा राग दिग्दर्शक महेश भट्टवर अधिक होता. विशेष म्हणजे यानंतरही डिंपलने विनोद खन्नासोबत काम केले, आणि पुढे काही चित्रपटांमध्ये ते पुन्हा एकत्र झळकले.

Vinod Khanna Dimple Kapadia and Madhuri Dixit Kissing Scenes

तसेच, विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा ‘दयावान’ मधील किसिंग सीन देखील मोठा वाद निर्माण करणारा ठरला. या सीनसाठी फिरोज खान यांनी माधुरीला एक कोटी रुपयांचे मानधन दिले होते. मात्र, सीन प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीला टीकेचा सामना करावा लागला आणि तिने सीन हटवण्यासाठी नोटीसही पाठवली. तरीही निर्माता-दिग्दर्शकाने तो सीन कायम ठेवला.

माधुरीसोबत सीन शूट करताना विनोद खन्ना इतके बेमालूम वागले की प्रत्यक्षातही प्रसंग घडतोय, अशी भावना निर्माण झाली होती. या सीनमध्ये त्यांनी माधुरीच्या ओठांना दुखापत केली होती, असेही नंतर समोर आले.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या