Share

हल्ल्यानंतर सलमान खानचा भावनिक निर्णय; निषेध व्यक्त करत घेतला मोठा निर्णय

“After the Pahalgam terror attack, Salman Khan postpones his UK tour ‘The Bollywood Big One Show’, expressing grief and solidarity.”

Published On: 

Salman Khan Postpones UK Tour After Pahalgam Attack

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम ( Pahalgam Attack ) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूड कलाकारांकडून हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. यामध्ये सलमान खाननेही ( Salman Khan ) निषेध व्यक्त करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सलमान खानने त्याचा मे महिन्यात होणारा ‘द बॉलिवूड बिग वन शो यूके’ दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्याने लिहिले, “काश्मीरमध्ये अलीकडे घडलेल्या दुःखद घटनांचा विचार करून, मँचेस्टर आणि लंडनमध्ये ४ आणि ५ मे रोजी होणारे शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व चाहत्यांची समजूत आणि पाठिंबा अपेक्षित आहे. लवकरच नव्या तारखांची घोषणा केली जाईल.”

Salman Khan Postpones UK Tour After Pahalgam Attack

सलमानच्या ‘द बॉलिवूड बिग वन शो यूके’ मध्ये माधुरी दीक्षित, वरुण धवन, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, सारा अली खान, कृती सेनन, मनीष पॉल आणि सुनील ग्रोव्हर यांसारखे कलाकारही सहभागी होणार होते.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने पोस्टमध्ये काश्मीरमधील परिस्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “स्वर्गासारखे काश्मीर नरकात बदलत आहे. निरपराध लोकांचे बळी घेतले जात आहेत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत,” असे भावनिक शब्दांत त्याने लिहिले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही