🕒 1 min read
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryawanshi ) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वैभवने केवळ ३५ चेंडूत तुफानी शतक झळकावून क्रिकेटविश्वाला थक्क केले आहे.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर २१० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र, राजस्थानच्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने मिळून हे लक्ष्य सहज गाठले. यशस्वीने ४० चेंडूत ७० धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने केवळ ३८ चेंडूत १०१ धावा फटकावल्या. आपल्या खेळीत त्याने ११ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली.
Vaibhav Suryawanshi smashed a 35-ball century in IPL 2025
वैभवच्या या झंझावाती कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच सोशल मीडियावर विराट कोहलीवर टीका केली जात आहे. १४ वर्षांच्या वैभवला आयपीएलमध्ये केवळ १ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध करण्यात आलं, तर विराट कोहलीला बंगळुरू संघाकडून २१ कोटी रुपये देण्यात आले आहेत, यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटप्रेमी आता वैभव सूर्यवंशीकडून पुढील सामन्यांतही अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले
- विराट कोहली आणि केएल राहुलच्या वादावर पियुष चावलाचे मोठे विधान
- लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही – मंत्री नरहरी झिरवळ