🕒 1 min read
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi ) भारतावर वादग्रस्त आरोप केले होते. शाहिद आफ्रीदीने म्हटले, “जम्मू-कश्मीरमध्ये जर एखादा फटाका फुटला तरीही पाकिस्तानवर आरोप केला जातो. तुमच्याकडे ८ लाख सैनिक असूनही जर अशा घटना घडत असतील, तर याचा अर्थ तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात, कारण. भारतीय लष्कर आणि सरकारने सुरक्षा देण्यात अपयश आले आहे.” असे म्हणत त्याने थेट भारतीय सुरक्षेवर आणि प्रशासनावर सवाल उपस्थित केला.
Asaduddin Owaisi Slams Shahid Afridi Over Pahalgam Attack Remarks | Calls Him a Joker
यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीवर सडकून टीका केली आहे. ओवैसी म्हणाले, “कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेताय?” असे म्हणत त्यांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
ओवैसी पुढे म्हणाले, ”पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाका. पाकिस्तान सतत दहशतवादाला मदत करत आहे, त्यामुळे कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, आफ्रिदीने दावा केला की, भारताने पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले. इस्लाम शांती शिकवतो, पाकिस्तान हिंसाचाराला पाठिंबा देत नाही, असे विधान केले.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहली आणि केएल राहुलच्या वादावर पियुष चावलाचे मोठे विधान
- लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही – मंत्री नरहरी झिरवळ
- धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तरी मंत्रालयात नावाची पाटी कायम; चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








