Share

ओवैसींचा सोलापुरात एल्गार; म्हणाले, “एक दिवस हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल!”

सोलापूरच्या प्रचारसभेत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारताच्या संविधानाचा दाखला देत त्यांनी भविष्यात हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Published On: 

Asaduddin Owaisi

सोलापुर– भारताच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? यावरून अनेकदा राजकीय चर्चा झडतात, पण सोलापुरात येऊन AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी जे भाकीत केलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “एक दिवस असा नक्की येईल…” अशी सुरुवात करत त्यांनी थेट भविष्यातील पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

Asaduddin Owaisi Solapur Speech on Hijab PM

शुक्रवारी सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना ओवैसींनी उपस्थितांना संविधानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या संविधानात एकाच धर्माचा व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो असं लिहिलंय, पण भारताच्या संविधानात सर्व समाजाला समान स्थान आहे. आपण तेव्हा नसू, पण एक दिवस असा येईल, जेव्हा हिजाब घालणारी मुलगी भारताची पंतप्रधान बनेल.” त्यांच्या या वक्तव्याने सभेत एकच जल्लोष झाला.

ओवैसींचं भाषण फक्त भविष्यावर नव्हतं. त्यांनी सध्याच्या महायुती सरकारचे वाभाडेही काढले. “सोलापुरात पेट्रोल १०४ रुपये लिटर आहे, पण भाव विचारले तर तुम्हाला थेट ‘बांगलादेशी’ ठरवलं जातं,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे त्रिकुट संविधानानुसार नाही, तर द्वेषाच्या बळावर हुकूमशाही करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

इतकेच नाही तर, “हे सरकार दलित आणि अल्पसंख्याकांचे मित्र नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, पण सत्ताधाऱ्यांना त्याचं काहीही सोयरसुतक नाही,” अशा शब्दांत ओवैसींनी महायुतीवर हल्लाबोल केला. १५ तारखेच्या मतदानातून या कारस्थानाला उत्तर द्या, असं आवाहनही त्यांनी (Asaduddin Owaisi) यावेळी सोलापूरकरांना केलं. आता ओवैसींच्या या ‘हिजाब’ कार्डचा निवडणुकीत किती प्रभाव पडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही