Share

“विराटचे वनडे रेकॉर्ड्स काहीच नाहीत?” मांजरेकरांचा पुन्हा ‘नवा’ वाद; म्हणाले, “१-२ नंबरला बॅटिंग करणं तर…”

“वनडेत १, २ किंवा ३ नंबरला बॅटिंग करून शतक ठोकणं मोठं काम नाही,” असं म्हणत संजय मांजरेकरांनी विराट कोहलीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यांच्या या विधानाने क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Published On: 

Sanjay Manjrekar, Virat Kohli, Rohit Sharma

पुणे – क्रिकेटच्या मैदानात विराटची बॅट शांत झाली तरी, मैदानाबाहेर संजय मांजरेकरांची (Sanjay Manjrekar) ‘जीभ’ मात्र शांत बसण्याचं नाव घेत नाही. “विराट कोहलीने टेस्ट सोडून वनडेवर लक्ष केंद्रित केलं, हा सोपा मार्ग निवडला,” असं विधान करून मांजरेकरांनी आधीच वाद निर्माण केला होता. आता त्यांनी त्याहून पुढे जात, विराट आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांच्या ‘लेगसी’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मांजरेकरांच्या मते, “वनडेत टॉप ऑर्डरला बॅटिंग करणं हे क्रिकेटमधलं सर्वात सोपं काम आहे.”

Sanjay Manjrekar on Virat Kohli ODI records

याचं कारणही त्यांनी इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलंय. ते म्हणतात, “तुम्ही जुन्या खेळाडूंकडे बघा. जे टेस्टमध्ये मिडल ऑर्डरला (चौथ्या, पाचव्या क्रमांकावर) खेळायचे, तेच लोक वनडेत ओपनिंग करायला किंवा टॉप ३ मध्ये खेळायला उत्सुक असायचे. का? कारण तिथे बॅटिंग करणं सोपं असतं.”

मांजरेकरांनी कोणाचेही नाव न घेता विराटच्या (Virat Kohli) ५३ वनडे शतकांवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही वनडेत १, २ किंवा ३ नंबरला खेळता, तेव्हा ना चार स्लिप असतात, ना गल्ली. गोलंदाज तुम्हाला आऊट करायला येत नाही, तर फक्त धावा वाचवायला येतो. त्यामुळे तुम्ही आरामात १०-१५ ओव्हर खेळून काढू शकता आणि सेट झाल्यावर शतक ठोकू शकता.” पण थांबा, खरा खेळाडू कोण? यावर मांजरेकरांनी (Sanjay Manjrekar) धोनी आणि युवीचं उदाहरण दिलं.

मांजरेकरांच्या मते, वनडेत खरी कसरत ४, ५ आणि ६ नंबरवर असते. “महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना हे ४, ५, ६ नंबरला खेळायचे. ती खरी कठीण जागा आहे. त्यामुळे जर तुम्हाला ‘बॅटिंग ग्रेट’ शोधायचा असेल, तर तो टॉप ३ मध्ये नाही, तर खाली शोधा,” असं रोखठोक मत त्यांनी मांडलं आहे.

विराटने मे महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं होतं. १२३ टेस्टमध्ये ९,२३० धावा करणाऱ्या विराटने वनडेवर फोकस केला आहे. मात्र, मांजरेकरांच्या या ‘बाँबगोळ्या’मुळे विराटच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही