Share

रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार? जय शाह यांनी भर कार्यक्रमात फोडला बॉम्ब; ‘हितमॅन’ची रिॲक्शन बघण्यासारखी!

ICC Chairman Jay Shah calls Rohit Sharma ‘Captain’ at a public event, sparking rumors about his leadership role for the 2027 World Cup.

Published On: 

ICC Chairman Jay Shah calls Rohit Sharma 'Captain' at a public event, sparking rumors about his leadership role for the 2027 World Cup.

🕒 1 min read

Rohit Sharma- भारतीय क्रिकेटमध्ये नक्की चाललंय तरी काय? एकीकडे शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जात असतानाच, आता खुद्द आयसीसी चेअरमन जय शाह (Jay Shah) यांनी भर कार्यक्रमात असं काही वक्तव्य केलंय की, संपूर्ण क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात जय शाह यांनी रोहित शर्माचा (Rohit Sharma) उल्लेख चक्क ‘भारतीय टीमचा कर्णधार’ असा केला आणि हे ऐकताच रोहितच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते!

सध्या रोहित शर्मा फक्त वन-डे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. टी-२० आणि कसोटीतून त्याने निवृत्ती घेतली असून, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डेची कमान शुभमन गिलकडे होती. पण एका जाहीर कार्यक्रमात जय शाह यांनी रोहितला थेट ‘कर्णधार’ म्हणून संबोधले. ते म्हणाले, “रोहितला कर्णधार म्हणावंच लागेल. कारण त्याच्या नेतृत्वात भारताने २०२४ चा टी-२० वर्ल्डकप आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.” २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये सलग १० सामने जिंकून भारताने जी धडक मारली होती, त्याचेही कौतुक शाह यांनी केले.

Will Rohit Sharma become the captain again?

जेव्हा जय शाह हे बोलत होते, तेव्हा रोहितच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्माईल होतं. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित पुन्हा एकदा बॅटने उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

रोहितचं वय आणि फिटनेस पाहता, बीसीसीआय २०२७ च्या वन-डे वर्ल्डकपसाठी (South Africa) त्याच्याकडे कर्णधार म्हणून बघतेय का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलला तयार करतानाच रोहितच्या अनुभवाचा फायदा घेण्याची ही रणनीती असू शकते. जय शाह यांच्या या एका विधानाने चाहत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या