🕒 1 min read
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगलेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli ) आणि केएल राहुल ( KL Rahul ) यांच्यात मैदानावरच वाद झाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या वादामागचं कारण माजी भारतीय फिरकीपटू पियुष चावलाने स्पष्ट केलं आहे. चावला म्हणाला की, कोहली फलंदाजी करत असताना दिल्ली कॅपिटल्सने क्षेत्ररक्षण लावण्यात जास्त वेळ घेतला. याबद्दल कोहलीने यष्टीमागे उभ्या असलेल्या केएल राहुलकडे नाराजी व्यक्त केली. मात्र राहुलने त्यावर प्रत्युत्तर देताना सांगितलं की, जर क्षेत्ररक्षणात विलंब झाला तर दिल्लीला स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरेल, त्यामुळे विराटने आपले लक्ष फक्त फलंदाजीवर केंद्रित करावे.
Virat Kohli vs KL Rahul Fight During Delhi vs RCB Match
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या. संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक 41 धावा 39 चेंडूत केल्या. मात्र या खेळपट्टीवर फलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागत होता. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवातीला 26 धावांत 3 विकेट गमावल्या, पण विराट कोहली आणि कृणाल पांड्याच्या भक्कम 119 धावांच्या भागीदारीमुळे बंगळुरूने 6 विकेट्सने विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या
- लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही – मंत्री नरहरी झिरवळ
- धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तरी मंत्रालयात नावाची पाटी कायम; चर्चांना उधाण
- “पाणी नाही, आश्वासनांचा पूर!” — छ. संभाजीनगरच्या थेंबथेंब तहानेमागचं राजकीय स्वार्थाचे काळं राजकारण