Share

‘रेड २’च्या प्रदर्शनाआधी सेन्सॉर बोर्डाची कारवाई, दोन डायलॉग्समध्ये बदल

“Censor Board demands last-minute changes in ‘Raid 2’, instructs makers to modify two dialogues and delete a controversial line before release.”

Published On: 

Censor Board Edits ‘Raid 2’ Before Release, Two Dialogues Changed | Ajay Devgn, Riteish Deshmukh

🕒 1 min read

२०१८ मध्ये गाजलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल ‘रेड २’ ( Raid 2 ) आता प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच, सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना काही बदलांचे आदेश दिले आहेत. अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने हिरवा झेंडा दाखवला असला तरी, प्रदर्शनाच्या आधी दोन संवाद बदलण्यास आणि आठ सेकंदाचा एक डायलॉग हटवण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रेल्वे मंत्री’ या शब्दाच्या जागी ‘मोठे मंत्री’ असा बदल करण्यात आला आहे. तसेच, “पैसा, हथियार, ताकत” हा सुरुवातीचा संवाद वगळण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय ‘रेड २’ला UA 7+ रेटिंग देण्यात आले असून एकूण चित्रपटाची लांबी २ तास ३० मिनिटे आणि ५३ सेकंद इतकी आहे.

Censor Board demands last-minute changes in ‘Raid 2′

‘रेड २’चे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले असून निर्मिती भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यातील रंगतदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. चित्रपटात रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘रेड २’मध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधातील संघर्षाची कथा मोठ्या पडद्यावर उलगडणार असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या