🕒 1 min read
IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अवघ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi ) आपल्या धमाकेदार शतकाने देशभरातील क्रिकेटप्रेमींना वेडे केले आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावून वैभवने इतिहास रचला. या अद्वितीय कामगिरीमुळे कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे.
Vaibhav Suryavanshi Father Thanks Rahul Dravid, Rakesh Tiwari
वैभवच्या यशाने संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी भावूक होत बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश कुमार तिवारी आणि राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं, “राकेश तिवारी यांनी वैभवची प्रतिभा ओळखून त्याला संधी दिली, तर राहुल द्रविड यांनी त्याला IPL सारख्या मोठ्या मंचावर खेळण्याची संधी दिली.”
बिहारच्या तरुणांनीही वैभवच्या खेळीचे कौतुक करत डान्स, केक कापणे आणि आतषबाजी करत हा ऐतिहासिक क्षण जल्लोषात साजरा केला.
महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माकडून वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाला ‘क्लास’ची शाबासकी
- हल्ल्यानंतर सलमान खानचा भावनिक निर्णय; निषेध व्यक्त करत घेतला मोठा निर्णय
- ‘रेड २’च्या प्रदर्शनाआधी सेन्सॉर बोर्डाची कारवाई, दोन डायलॉग्समध्ये बदल