Share

KKR च्या ‘या’ सलामीच्या जोड्या आहेत धोकादायक, यंदाही मिळवून देऊ शकतात ट्रॉफी?

Kolkata Knight Riders have added some new players to their squad this season, while KKR on the other hand have selected 3 best opening pairs for IPL 2025.

by MHD

Published On: 

KKR 3 new best opening combination for IPL 2025

🕒 1 min read

KKR । केकेआरने आयपीएलच्या 2024 (IPL 2024) च्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. पण यंदाही (IPL 2025) हाच संघ विजेतेपद जिंकू शकतो, असा दावा केला जात आहे. याला कारण आहे संघाच्या सलामीच्या जोड्या. संघाकडे अशा काही सलामीच्या जोड्या आहेत ज्या पुढच्या संघासाठी अडचणीच्या ठरू शकतात. (Kolkata Knight Riders)

कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या मोसमात त्यांच्या संघात काही नवीन खेळाडू (Kolkata Knight Riders Squad) जोडले आहेत, तर दुसरीकडे केकेआरमध्ये आयपीएल 2025 साठी 3 सर्वोत्कृष्ट सलामीच्या जोड्या निवडल्या आहेत. ज्या संघाला ट्रॉफी मिळविण्यात मदत करतील. आयपीएल 2024 मध्ये, रहमानुल्ला गुरबाज केकेआरसाठी सलामीच्या सुनील नरेनबरोबर चांगला खेळला होता.

सुनील नरेन आणि रहमानुल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) व्यतिरिक्त, वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि सुनिल नरेन (Sunil Narine) ही देखील सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी आहे. कोलकाता नाइट राइडर्स त्यांच्या संघात आयपीएल 2025 मध्ये वेंकटेश अय्यरवर मोठी बोली लावली होती. जर सुनील नरेन आणि वेंकटेश अय्यर ही जोडी मैदानात उतरली तर प्रतिस्पर्धी संघाला त्याचा धोका आहे.

KKR opening pair

वेंकटेश अय्यर आणि सनिल नरेन यांच्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेनची जोडी देखील सर्वोत्कृष्ट आहे. टी -20 लीगमध्ये क्विंटन डी कॉकला सलामीचा खेळाडू म्हणून प्रचंड अनुभव आहे,जर ही जोडी देखील मैदानात असेल तर पुढच्या संघाच्या अडचणी वाढतील. त्यामुळे आता आयपीएल 2025 साठी केकेआर कोणत्या जोडीला सलामी म्हणून पाठवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)