Share

“Walmik Karad ठणठणीत, त्याचे रिपोर्ट…”; Anjali Damania यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Social activist Anjali Damania has taken an aggressive stance in the Santosh Deshmukh murder case from the beginning and now she has made another revelation.

by MHD

Published On: 

Make Walmik Karad report public, Anjali Damania demands

🕒 1 min read

Anjali Damania । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्या वाल्मिक कराड (Walmik Karad) विषयी धक्कादायक खुलासे करत असतात.

सध्याही दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. “वाल्मिक कराड ठणठणीत आहेत. खंडणी मागतांना, जीवे मारण्याच्या धमक्या देतांना, अगदी ठणठणीत होते ना? मग आशांना दया माया कशासाठी? त्यांचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट, CT स्कैन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा (with films). आणि त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोडला करा,” अशी मागणी त्यांनी एका पोस्टद्वारे केली आहे.

दमानिया यांच्या मागणीवरून मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराड खरोखरच ठणठणीत तर नाही ना? त्याला वाचवण्यासाठी त्याला दवाखान्यात भरती केले का? असे सवाल सध्या अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

Anjali Damania on Walmik Karad

महत्त्वाची बाब म्हणजे आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती (Walmik Karad Property) एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे. त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी खूप मोठा धक्का ठरु शकतो. याआधी सीआयडीने कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही