Mamta Kulkarni । बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री आणि अभिनेते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. सध्या बॉलिवूड विश्वात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने संन्यास घेतला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी होय. ममता कुलकर्णीचा पट्टाभिषेक कार्यक्रम किन्नर आखाड्यात पार पडला आहे. ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी ममता कुलकर्णी मागील अनेक वर्षापासून भारताबाहेर राहत होती. पण आता भारतात येताच तिने संन्यास घेतला आहे.
ममता कुलकर्णीच्या आयुष्यात काही घडामोडी घडल्यानंतर तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनेत्री आता महामंडलेश्वर म्हणून ओळखली जाणार आहे. माहितीनुसार आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममताला भिक्षा दिल्यानंतर तिला आता महामंडलेश्वर ही पदवी मिळाली आहे.
Mamta Kulkarni film list
ममता ‘नानबर्गल’ या साऊथ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर तिने राम लखन, वक्त हमारा है, क्रांतिवीर, करण अर्जुन, सबसे बड़ा खिलाडी यांसारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केले आहे. पण आता तिने संन्यास घेतल्याने बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Mamta Kulkarni films)
महत्त्वाच्या बातम्या :