Share

‘मी विष्णूचा 10 वा अवतार पाहिलाय…’; ममता कुलकर्णींच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ, गायीबद्दलही केलं मोठं विधान!

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपण विष्णूचा दहावा अवतार पाहिल्याचा दावा केला असून गायींच्या संरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.

Published On: 

Mamta Kulkarni Statement: 'मी कल्कीला पाहिलंय!'; ममताचा दावा

नव्वदच्या दशकात आपल्या बोल्ड अदांनी तरुणाईला घायाळ करणारी ‘ती’ अभिनेत्री आठवतेय का? होय, ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). सध्या लाइमलाईटपासून दूर अध्यात्माच्या वाटेवर चालणाऱ्या ममता कुलकर्णीने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिने थेट भगवान विष्णूंच्या दहाव्या अवताराबद्दल असा काही दावा केलाय की, ऐकणाऱ्यांना धक्काच बसला आहे.

दिग्दर्शक अमित प्रजापती यांच्या आगामी ‘गोदान’ (Godan) या चित्रपटाच्या निमित्ताने ममता कुलकर्णी पुन्हा चर्चेत आली आहे. तिने केवळ या सिनेमाचे कौतुकच केले नाही, तर काही धक्कादायक अनुभवही शेअर केले.

Mamta Kulkarni Statement

ममता कुलकर्णीने दावा केला की, “मी साक्षात भगवान विष्णूंचा दहावा अवतार असलेल्या कल्कीला पाहिलं आहे.” एवढंच नाही तर, आता असा काळ जवळ येतोय जेव्हा गाई दूध देणं बंद करतील, असा इशाराही तिने दिला. ती म्हणाली, “आज आपण ज्याप्रमाणे पाण्याचा अपव्यय करतोय, तशीच दुर्दशा गोमातेची सुरू आहे. ज्यांचे डोळे अजून उघडले नाहीत, त्यांनी आताच सावध व्हावं, नाहीतर खूप उशीर होईल.” स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलताना तिने सांगितले की, 25 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर ती आज समाधी अवस्थेपर्यंत पोहोचली आहे.

गायीच्या संरक्षणाबाबत बोलताना ममताने थेट इतर धर्मांतील धर्मग्रंथांचे दाखले दिले. “मी कुराण आणि बायबल दोन्ही वाचलंय. कुठल्याही धर्मात गोहत्येचं समर्थन केलेलं नाही. उलट प्रत्येक धर्मात आईला सर्वोच्च स्थान दिलं आहे,” असं रोखठोक मत तिने मांडलं. इस्लाममध्येही आईला तीन वेळा महत्त्व दिलं गेल्याचं उदाहरण तिने दिलं.

सध्या समाज मानसिकदृष्ट्या विकृत झाला असून युद्ध आणि दुष्काळ हे आपल्याच कर्मांचे फळ असल्याचे तिने म्हटले. ‘गोदान’ हा चित्रपट भारतीय संस्कृती आणि विज्ञान मांडणारा असून तो प्रत्येक भारतीयाने पाहिला पाहिजे, असे आवाहनही तिने केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही